पुणे शहरातील प्रकल्प महापालिका प्रशासनानं वेगानं पूर्ण करावेत; शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून त्यावर तातडीने कारवाई करून नागरिकांसाठी रस्ते मोकळे करावेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल प्रशासनाला दिला. पुणे शहरात महापालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मोहोळ यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मोहोळ बोलत होते.
Site Admin | January 5, 2025 8:39 AM | Minister Murlidhar Mohol | Pune