पुणे विभागात गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजे जीबीएस चे आतापर्यंत २०८ रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये प्रामुख्यानं कॅम्पायलो-बॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचा संसर्ग आढळून आला असून, हेच जीबीएस उद्रेकाचं कारण असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागानं दिली आहे.
या रुग्णांपैकी 42 रुग्ण पुणे महापालिका हद्दीतले, 94 रुग्ण पुणे महापालिकेत नव्यानं समाविष्ट केलेल्या गावांमधले, 30 पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतले तर 32 पुणे ग्रामीण भाग आणि 10 रुग्ण इतर जिल्ह्यातले आहेत. सिंहगड रस्ता परिसरात आढळलेले ९० रुग्ण हे नांदेड गावातील विहीर आणि खडकवासला धरणातील पाण्याचा स्रोत वापरणारे आहेत.