डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन

पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल झालं. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, विश्वस्त सतीश आळेकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्यासह सांस्कृतिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी महोत्सवाचे आंतरराष्ट्रीय परीक्षक, तज्ञ आणि रसिक यावेळी उपस्थित होते.

 

राज्य सरकार मुंबईत 10 एकर जागेवर मनोरंजन क्षेत्रातली जागतिक स्तरावरची शैक्षणिक संस्था उभारणार असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. यंदाचं वर्ष हे ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे; त्यानिमित्त ‘शोमन राज कपूर’ ही यावर्षीच्या महोत्सवाची संकल्पना असल्याचं डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितलं. प्रसिद्ध अभिनेत्री शुभा खोटे यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ‘पीफ डिस्टींग्वीश अॅवार्ड’, तर प्रसिद्ध पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

 

उद्घाटन सोहळ्याच्या सुरुवातीला दिवंगत उस्ताद झाकीर हुसेन यांना अभिवादन म्हणून तालकचेरी हा कार्यक्रम सादर करण्यात आला. दिग्दर्शिका मार्गारिटा व्हिसारिओ यांचा ग्लोरिया हा उद्घाटनाचा चित्रपट दाखवण्यात आला. येत्या वीस तारखेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध देश-परदेशातले सुमारे 150 चित्रपट, दाखवले जाणार आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा