पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत २ लाख ८ हजार ८८६ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ओळख क्रमांक जुन्नर तालुक्यात दिले आहेत. पुणे शहरात शेतकऱ्यांची संख्या कमी असल्यानं केवळ २१ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आले . शेतकऱ्यांकडे जमीन, कर्ज, मिळणार्या योजनांचा लाभ आदी माहिती असणारं एक ओळखपत्र ऍकग्रिस्टेकच्या माध्यमातून दिलं जातं. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी यापुढे ओळख क्रमांक गरजेचा आहे. त्यामुळे शेतकर्यांदनी नोंदणी करून लवकरात लवकर ओळख क्रमांक घ्यावा असं आवाहन उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर यांनी केलं आहे.
Site Admin | February 16, 2025 8:25 AM | farmers | Pune
पुण्यात शेतकऱ्यांना ओळखपत्राचं वाटप
