पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातला आरोपी दत्ता गाडेला आज पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातल्या कनाट गावातल्या ग्रामस्थांनी पोलिसांना मदत केली. त्याला आज न्यायालयात हजर केलं जाईल. हा खटला जलदगती न्यायालयात चालवणार असल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.