पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयानं १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मध्यरात्री त्याला शिरूर तालुक्यातल्या गुनाट गावातून अटक केली होती. हे प्रकरण द्रुतगती न्यायालयात चालवलं जाईल, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
Site Admin | February 28, 2025 7:35 PM | Pune Crime | Pune Police
स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातल्या आरोपीला पोलीस कोठडी
