डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचा काल समारोप झाला. 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आलेल्या या महोत्सवाला पुण्यासह राज्यभरातील पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. 

 

वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं भरवलेल्या पुणे पुस्तक महोत्सवाला 10 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी भेट दिली, असं महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे यांनी सांगितलं आहे. या महोत्सवात लाखों पुस्तकांची खरेदी झाली, महोत्सवाला भेट देणाऱ्यांमध्ये लहान मुलं, शालेय विद्यार्थी आणि तरुणाईचा लक्षणीय सहभाग होता, महोत्सवाच्या अनुषंगानं बाल चित्रपट महोत्सव, मुलांसाठी कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम या सारखे विविध उपक्रम घेण्यात आले; साहित्य रसिकांबरोबरच अनेक लेखकांनी महोत्सवाला भेट देत वाचकांशी उत्स्फूर्त संवाद साधला. लिटरेचर फेस्टिव्हल हे पुणे पुस्तक महोत्सवाचं यावर्षीचं वैशिष्ट्य होतं.

 

ज्येष्ठ निवेदक हरिश भिमानी, शिव खेरा, मीरा बोरवणकर, यांच्यासह ५० पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय किर्तीचे लेखक अभिनेते वक्ते तज्ञ मान्यवर यात सहभागी झाले होते. त्यांच्या कार्यक्रमांनाही रसिकांनी मोठी गर्दी केली. या महोत्सवात ४ विश्वविक्रम झाले. भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने, संविधानाच्या मुखपृष्ठाचं शिल्प पुस्तकांच्या साहाय्याने तयार करण्यात आले. त्यासाठी ९७ हजारांपेक्षा जास्त पुस्तकांचा वापर केला गेला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप झाला. मराठी भाषा टिकवायची असेल तर ती ज्ञानभाषा व्हायला हवी. मराठी भाषा टिकवण्यासाठी मराठी शाळा टिकवणं आणि त्या उत्तम पद्धतीने चालवणं आवश्यक आहे असं मत माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा