डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 23, 2024 6:34 PM | Pune Accident

printer

पुण्यात फूटपाथवर झोपलेल्यांना डंपरने चिरडल्याने ३ जणांचा मृत्यू

पुण्यात फूटपाथवर झोपलेल्या ९ जणांना भरधाव डंपरने चिरडल्याने ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. डंपर चालकाचं डंपरवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. ही घटना पुणे शहरातल्या वाघोली चौक परिसरात काल मध्यरात्री घडली. मोटार वाहन कायदा आणि आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. डंपरचा चालक हा दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेले सर्वजण कामगार असून ते काल रात्रीच अमरावतीमधून पुण्यात आले होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा