९व्या आशिया आर्थिक संवाद कार्यक्रमाचं आजपासून तीन दिवस पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे. आशिया आर्थिक संवाद हा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा वार्षिक उपक्रम असून भू-अर्थशास्त्राबाबत विविध मुद्यांवर विचारविनिमय होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाबरोबरच पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सहयोगानं या कार्यक्रम होणार आहे.
ट्रॅक वन पॉइंट फाइव्ह डायलॉग या विखंडन युगातील आर्थिक पुनरुत्थान आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता अशी या वर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भू- अर्थशास्त्रातील कृत्रिम बुध्दीमत्ता, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा, सागरी क्षेत्रातील अर्थकारण आदी अनेक विषयावर चर्चा अपेक्षित आहे. विविध पक्षाचे राजकीय नेते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, धोरणकर्ते तज्ञ, उद्योजक तसंच देशविदेशातील भूअर्थशास्त्रासाठी काम करणाऱ्या संस्थासंघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
भू-अर्थशास्त्रातील कृत्रिम बुध्दीमत्ता, ऑटोमेशन, सायबर सुरक्षा, सागरी क्षेत्रातील अर्थकारण आदी अनेक विषयावर चर्चा अपेक्षित आहे. विविध पक्षाचे राजकीय नेते, वरिष्ठ सरकारी अधिकारी, धोरणकर्ते तज्ञ, उद्योजक तसंच देशविदेशातील भूअर्थशास्त्रासाठी काम करणाऱ्या संस्थासंघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.