२०१९ च्या पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर आदरांजली वाहिली. या जवानांचं बलिदान आणि देशाप्रति असलेलं त्यांचं समर्पण येणाऱ्या पिढ्या कधीच विसरणार नाहीत, असं प्रधानमंत्री म्हणाले. २०१९ ला आजच्या दिवशी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही समाजमाध्यमावर पुलवामा हल्ल्यातल्या शाहिद जवानांना आदरांजली वाहिली. दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवून त्यांचा समूळ नायनाट करायचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे, असं शाह म्हणाले. दहशतवाद हा संपूर्ण मानवजातीचा शत्रू असून सर्व जग त्याविरोधात एकवटलं आहे, भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार दहशतवाद बिलकुल खपवून घेत नाही, असं शाह म्हणाले.