पुद्दुचेरी विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांच्या अभिभाषणाने सुरु झालं. पुद्दुचेरी चं राज्य स्थूल उत्पादन गेल्या ५ वर्षात दरसाल दरशेकडा ९ पूर्णांक ५६ शतांश दराने याप्रमाणे ४४ पूर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढलं असल्याचं त्यांनी अभिभाषणात सांगितलं.