डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ साठी मतं आणि सूचना मागवण्यात आल्या

संयुक्त संसदीय समितीने वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वर जनता, एनजीओ, तज्ज्ञ आणि संस्थांकडून मतं आणि सूचना मागवल्या आहेत. लोकसभा सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. लेखी सूचना इंग्रजी किंवा हिंदी भाषेत jpcwaqf-Iss@sansad.nic.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात असं सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तसंच संयुक्त सचिव, लोकसभा सचिवालय, रूम क्रमांक ४४०, संसद भवन, नवी दिल्ली या पत्त्यावरही सूचना पाठवता येतील असं सांगण्यात आलं आहे. या सूचना पंधरा दिवसांच्या आत पाठवायच्या आहेत. या सूचना गोपनीय ठेवल्या जातील तसंच समितीकडून त्यांची नोंद घेतली जाईल. ज्यांना समितीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून मत मांडायचं असेल त्यांनी पत्र किंवा ईमेल मध्ये तसं सूचित करावं, मात्र याबाबत अंतिम निर्णय समितीचाच असेल असं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. 

 

वक्फ सुधारणा विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत मांडण्यात आलं होतं. जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीकडे ते परीक्षणासाठी पाठवण्यात आलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही समिती यासंबंधीचा अहवाल संसदेत सादर करणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा