एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांची काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केलं आहे. मंत्रालयात एच एम पी व्ही विषाणूसंदर्भात आज झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या आजारासंदर्भात माध्यमांनी योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, असं आवाहन आबिटकर यांनी केलं.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलतांना, राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं स्पष्ट केलं आहे. तरीही सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण व्यवस्थेच्या तयारीत राहावं, आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.