महाराष्ट्र विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
10 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचा जाहिरनामा प्रसिद्ध केला जाणार असल्याचंही ते म्हणाले.