पुण्यासह राज्यभरात चिकनगुनियाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिकुनगुन्याच्या विषाणूत झालेला बदल तपासण्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात क्रमनिर्धारण करण्यासाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांकडून रक्त नमुने घेण्यात येणार आहेत. चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये जीवघेणी लक्षणं दिसत असल्याचा दावा काही रुग्णालयांनी केला आहे. आरोग्य विभागाला अद्याप चिकुनगुन्याच्या रुग्णांमध्ये वेगळी लक्षणं दिसून आलेली नाहीत, अशी माहिती पुणे आरोग्य विभाग सहसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी दिली.