लोकमान्य टिळकांनी पुण्यातून सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव आता आंतरराष्ट्रीय झाला आहे. अमेरिकेतल्या मेरीलँड राज्यात ग्रेटर बाल्टिमोर टेम्पल इथं मोठ्याजल्लोषात मिरवणूक काढून गणेशाची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र सत्संग परिवार, मराठी हिंदू सेवा संघ कराचीमधल्या रत्नेश महादेव मंदिरात गणपती बसवतात. याविषयी कराचीमध्ये राहणारे विशाल राजपूत यांनी आकाशवाणीला सांगितलं…