सार्वजनिक प्रसारण दिन आज साजरा होत आहे. फाळणीच्या वेळी हरियाणात कुरुक्षेत्र इथं आसरा घेतलेल्या निर्वासितांना आधार देणारं भाषण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी १२ नोव्हेंबर १९४७ रोजी आकाशवाणी दिल्लीच्या स्टुडियोमधून केलं होतं. त्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस साजरा होतो. आकाशवाणी दिल्लीच्या सभागृहात आज या निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन दुपारी ३ वाजल्यापासून होणार आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरुन दुपारी ३ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी प्रसारित होईल.
Site Admin | November 12, 2024 1:56 PM | आकाशवाणी | सार्वजनिक प्रसारण दिन