उत्तरप्रदेश राज्यातल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी, उत्तरप्रदेश राज्यमार्ग परिवहन महामंडळा कडून इलेक्ट्रिकच्या बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.
येत्या १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या महाकुंभ दरम्यान होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता, सुयोग्य नियोजन करण्यासाठी ग्रामीण भागातल्या वाहतुकीसाठी सुमारे सात हजार बसगाड्या आणि शहरातल्या वाहतुकीसाठी साडेतीनशे बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे.
महाकुंभ मेळ्याच्या संगम सोहळा परिसराच्या आसपास उत्तर प्रदेश पोलिसांची विशेष तपासणी मोहीम सुरु असून यंदा या धार्मिक सोहळ्यात परदेशी नागरिकांसह सुमारे ४५ कोटींपेक्षा भाविक सहभागी होतील, असा सरकारचा अंदाज आहे.