केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी काल नवी दिल्ली इथं श्रम मंत्रालयात सक्तवसुली अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या ३४ उमेदवारांना नियुक्ती पत्रं दिली. निवड झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन करून डॉ. मांडविय यांनी कामगारांच्या कल्याणासाठी परिश्रम करण्याचं आणि कामगार कायद्याच्या पालनाकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं. त्यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या सचोटी, समर्पण आणि वचनबद्धता या मूल्यांचे पालन करण्याचं आवाहन केलं. कामगारांसाठी न्याय्य आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या योगदानाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केलं आणि देशाच्या प्रगतीसाठी वचनबद्ध राहण्याचं आवाहन केलं.
Site Admin | December 27, 2024 3:15 PM | Dr. Mansukh Mandaviya
सक्तवसुली अधिकारी नियुक्त झालेल्या ३४ उमेदवारांना नियुक्ती पत्रं प्रदान
