परवडणाऱ्या दरातली घरं आणि वाढत्या घरभाड्याच्या विरोधात स्पेनमधल्या माद्रिदमध्ये काल हजारो लोकांनी आंदोलन केलं. घरभाड्याची रक्कम कमी करावी आणि जगण्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण करावी अशी त्यांची मागणी होती.
पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात जागा देऊन अधिक उत्पन्न मिळत असल्यानं स्पेनमधल्या घरमालकांनी घरभाड्याने देण्याऐवजी पर्यटकांना द्यायला प्राधान्य दिलं आहे.