श्रीलंकन अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शनं केली. श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या ९७ मच्छिमारांना अटक केली असून त्यांना परत आणलं पाहिजे, असा मुद्दा द्रमुक खासदार कनिमोळी यांनी लोकसभेत शून्य प्रहरात उपस्थित केला. लोकसभेत सध्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.
Site Admin | February 7, 2025 2:21 PM | Sri Lanka | Tamil Nadu
श्रीलंकन अधिकाऱ्यांनी तामिळनाडूतल्या मच्छिमारांना ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांकडून निदर्शनं
