भारतीय मजदूर संघाने काल जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. निवृत्तीवेतन महागाई निर्देशांकाशी जोडलेलं असावं, किमान निवृत्तीवेतन ५००० करावं,जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी.
सामाजिक सुरक्षा कोड लागू करावा, पाच वर्षे झालेल्या उद्योगामधल्या कर्मचाऱ्यांसाठी किमान वेतन लागू करावं, अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावं या मागण्यांसाठी काल मजदूर संघानं देशभरात आंदोलन केलं. याचाच भाग म्हणून जळगावात ही निदर्शनं झाली.