डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

December 10, 2024 7:28 PM | Bangladesh

printer

बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन

बांगलादेशात अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदू समुदायावर अत्याचारांच्या घटनांचा निषेध करण्यासाठी आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. बांगलादेश सरकारने अत्याचाराविरोधात कठोर पावलं उचलावीत आणि हिंदू धर्मगुरूंची सुटका करावी, असा आग्रह भारत सरकारने करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नाशिकमध्ये विविध संघटनांनी काढलेल्या मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. धुळे शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. सोलापुरात अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. यावेळी बांगलादेशाचा ध्वज जाळून निषेध करण्यात आला. रत्नागिरीत विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता. यात आमदार उदय सामंत आणि किरण सामंत सहभागी झाले होते. विदर्भात गोंदिया आणि अकोला इथंही जन आक्रोश रॅली काढण्यात आली. यावेळी बांगलादेशाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

मराठवाड्यात धाराशिवमध्ये सकल समाजाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली. हिंगोलीत गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नांदेड, परभणी आणि जालना शहरातही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून बांगलादेशातल्या हिंदूवरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा