राज्यात अंगणवाडी उभारणी, दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मोनिका राजळे यांनी उपस्थित केला होता. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जिल्हा परिषद निधी, जिल्हा नियोजन समितीच्या निधीद्वारे दुरुस्ती, नवीन बांधकामं केली जातात असं तटकरे यांनी सांगितलं.
ऑटोरिक्षा, टेम्पो आदी वाहनांच्या परवाना नूतनीकरणासाठी विलंब झाल्यास पन्नास रुपये प्रति दिन विलंब शुल्क म्हणून दंड आकारण्यात येत होता, त्याला स्थगिती देण्यात येत असल्याची माहिती प्रभारी मंत्री दादा भुसे यांनी एका निवेदनाद्वारे सभागृहात दिली.