दहा हजार पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांच्या नवीन ग्रंथालय मान्यतेचा फेर प्रस्ताव शासनाकडे तातडीनं सादर करावा, अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.
जिल्हा ग्रंथालय आणि अन्य ग्रंथालयांच्या विविध मागण्यांसंदर्भात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम सुधारणेसंदर्भातला प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, तसंच ग्रंथालय अ. ब. क. ड वर्गाचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्रंथालयांना ऑनलाइन वर्ग बदल करण्याच्या अनुषंगाने प्रणाली विकसित करावी, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.