डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शरण आलेल्या नक्षल्यांसाठी गडचिरोलीमध्ये ‘प्रोजेक्ट संजीवनी’ची सुरुवात

गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांमुळे प्रभावीत होऊन शरण आलेल्या नक्षल्यांसाठी पोलिसांनी ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत शरण आलेल्या नक्षल्यांना हक्काचं निवासस्थान मिळावं यासाठी चार रो-हाऊसेस तयार करण्यात येणार आहेत; त्याचं भूमिपूजन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते काल झालं. राज्य शासनाने २००५ पासून नक्षल्यांसाठी आत्मसमर्पण योजना सुरु केली. ही योजना आणि गडचिरोली पोलिसांनी राबविलेले लोकोपयोगी उपक्रम बघून आतापर्यंत ७०४ नक्षल्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. यातील बहुतांश जणांचं पुनर्वसन पोलिसांनी केलं आहे. त्यांच्यासाठी आता ‘प्रोजेक्ट संजीवनी’ हा नवा उपक्रम सुरु करण्यात आला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा