लातूर शहरातल्या घनकचरा व्यवस्थापनासाठी नेमलेल्या जन-आधार सेवाभावी संस्थेचं कंत्राट संपल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग दिसून येत होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया लातूर महानगरपालिका प्रशासनानं सुरू केली आहे. दरम्यान, महानगरपालिकेनं शहरातला कचरा उचलायला सुरुवात केली असून गेल्या ५ दिवसात १ हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलणार असल्याचं लातूर महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | September 11, 2024 3:31 PM | Latur