भारतीय पोलीस दलातल्या वर्ष २०२३ च्या तुकडीच्या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. कायदा आणि सुव्यवस्था हा केवळ शासन व्यवस्थेचा पाया नसून तो आधुनिक राज्याचा आधार आहे, असं राष्ट्रपती मुर्मू प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना संबोधित करताना म्हणाल्या. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असेल तरच आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य आहे, नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण केल्यानेच प्रगतीला अर्थ प्राप्त होतो , असंही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.
Site Admin | September 30, 2024 8:15 PM | भारतीय पोलीस दल | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू