कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महत्त्वपूर्ण खाजगी गुंतवणूकीत भारत जगात दहाव्या स्थानावर पोहोचला आहे. संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास संस्थेच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेष अहवाल २०२५ मध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
या यादीत ६ हजार ७०० कोटी अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणूकीसह अमेरिका पहिल्या स्थानावर तर ७८० कोटी अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणूकीसह चीन दुसऱ्या स्थानावर आहे. भारताची या क्षेत्रातली खाजगी गुंतवणूक सुमारे १४० कोटी डॉलर इतकी आहे.