डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड यांनी रविवारी राजभवनात राज्यपालांची घेतली भेट

इंग्लंडचे राजे चार्ल्स यांचे धाकटे बंधू प्रिन्स एडवर्ड हे सध्या मुंबई भेटीवर असून त्यांनी काल राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि ब्रिटनमधले संबंध मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं तसंच दोन्ही देशांमधे सहकार्याची भावना वाढीला लागावी, अशी इच्छाही व्यक्त केली. भारतात क्रिकेट या खेळाची लोकप्रियता नमूद करून बॅडमिंटनमधे भारताच्या प्रगतीचंही त्यांनी कौतुक केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा