राष्ट्रीय युवा दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत.दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. विकसित भारतासाठी 1 लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे. यावेळी तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादनं आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे.
स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि विवेकानंद केंद्र, सोलापूर यांच्या वतीनं आजपासून १४ जानेवारी पर्यंत सामूहिक सूर्यनमस्कार, रक्तदान शिबिर, व्याख्यान, प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि पुस्तक प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.