डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ब्रिटनबरोबरचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डेव्हिड लॅमी यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ब्रिटनसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या भेटीनंतर सांगितलं.डेव्हिड लॅमी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही भेट घेतली. तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि ब्रिटन दरम्यान २०२१ मध्ये व्हर्च्युअल समिटमध्ये झालेल्या कराराचा दोन्ही मंत्र्यांनी आढावा घेतला. दोन्ही देशांत झालेल्या व्यापार करारा संदर्भात यावेळी समाधान व्यक्त करण्यात आलं.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा