डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

महायुती सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची धुळ्यातील सभेत ग्वाही

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू असून दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशात कॉँग्रेस जाती विभाजनाचा धोकादायक खेळ खेळत असल्याची घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल धुळे इथल्या प्रचार सभेत केली. एनडीए सरकार आणि राज्यातील महायुती सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. त्यानंतर नाशिक इथंही पंतप्रधानांची सभा झाली. उज्ज्वला योजना, हर घर जल योजना, पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजनांचा राज्यातल्या लाखो लाभार्थींना लाभ होत आहे, असं ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या केंद्राच्या पीएम किसान योजनेतून आणि राज्यातल्या महायुती सरकारच्या नमो शेतकरी योजनेंतर्गत दरवर्षी 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत आहे. महायुती पुन्हा सत्तेत आल्यास ही मदत वार्षिक 15 हजार रुपये करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. पायाभूत प्रकल्पांसाठी सरकारची कटिबद्धता अधोरेखित करून हे प्रकल्प रखडल्याबद्दल महाविकास आघाडीवर त्यांनी जोरदार टीका केली. प्रधानमंत्री मोदी यांची आज अकोल्यात जाहीर सभा होणार आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा