प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली इथं विविध विकास कामांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. जेजे क्लस्टर मधल्या रहिवाशांसाठी बांधलेल्या सुमारे १७ शे फ्लॅट्स चं ते उद्घाटन करतील, तसंच नवी दिल्लीतल्या अशोक विहार इथल्या पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घराची चावी सुपूर्द करतील. दिल्लीतल्या दोन नागरी पुनर्विकास प्रकल्पांचं ते उद्घाटन करतील. द्वारका इथल्या सुमारे ३०० कोटी रुपये खर्चाच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एकात्मिक कार्यालय संकुलाचं उद्घाटनही ते करतील. दिल्ली विद्यापीठातल्या ६०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या तीन नवीन प्रकल्पांची प्रधानमंत्री उद्या पायाभरणी करतील. यामध्ये नजफगढ इथल्या वीर सावरकर महाविद्यालयाच्या इमारतीचा समावेश असून, या ठिकाणी अत्याधुनिक शिक्षण सुविधा उपलब्ध केल्या जातील.
Site Admin | January 2, 2025 1:55 PM | PM Modi