डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रेशीमबागेतल्या स्मृती मंदिरात ते डॉ केशव बळिराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील. त्यानंतर दीक्षाभूमीलाही भेट देऊन ते आदरांजली वाहणार आहेत. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी होणार आहे. याठिकाणी ते नागरिकांना संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नागपूरमधील सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडच्या ड्रोनसाठीच्या धावपट्टी सुविधेचं उद्घाटन करतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा