प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभागाचे सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.
भारत ब्रुनेई राजनैतिक संबंधांना ४० वर्ष पूर्ण होत असताना हा दौरा होत असून ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय प्रधानमंत्री आहेत, असं ते म्हणाले. ब्रुनेईचा दौरा झाल्यानंतर प्रधानमंत्री सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरच्या प्रधानमंत्र्यांच्या आमंत्रणावरुन ते तिथे जाणार असून या भेटीत अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.