प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते ८४ विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन करणार असून श्रीनगरमध्ये उद्या होणाऱ्या `युवकांचं सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये बदल` या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सरकारी सेवेत प्रवेश करणाऱ्या दोन हजार उमेदवारांना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्त्यांची पत्रं वितरित करण्यात येतील. तसंच उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सुमारे ७ हजार नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर मधे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
Site Admin | June 20, 2024 1:33 PM | जम्मू-काश्मीर | नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री दोन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर
