जमैकाचे प्रधानमंत्री डॉक्टर अँड्रयू होलनेस आजपासून चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. जमैकाच्या प्रधानमंत्र्यांचा द्विपक्षीय स्तरावरील हा पहिलाच भारत दौरा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जमैकाचे समपदस्थ यांच्या विविध मुद्यांवरील बैठकीच्या निमित्ताने यापुर्वी अनेकदा भेटी झाल्या आहेत. जमैकाचे प्रधानमंत्री या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदी यांच्यासह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. तसंच विविध क्षेत्रातील व्यापार आणि औद्योगिक प्रतिनिधींबरोबर बैठकीत सहभागी होतील. द्विपक्षीय संबंधांना चालना देण्याच्या उद्देशाने अनेक सामंजस्य करार होण्याची शक्यता आहे. डॉक्टर अँड्रयू यांच्या भेटीमुळे भारत आणि जमैका दरम्यान, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा संबंध आणखी वृध्दींगत होण्याची अपेक्षा आहे.
Site Admin | September 30, 2024 9:01 AM | India | Jamaica