ग्रीनलँडचे प्रधानमंत्री म्यूट बी. एगेडे यांनी अमेरिकेच्या नियोजित दौऱ्यावर टीका केली आहे. अमेरिका हा दौरा ग्रीनलँडवर जबरदस्तीने दबाव टाकण्यासाठी करत असल्याचं एगेडे यांनी म्हटलं आहे. ट्रम्प प्रशासनाच्या ग्रीनलँडच्या नियोजित दौऱ्याचे नेतृत्व उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या पत्नी उषा व्हान्स, व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ आणि ऊर्जा सचिव ख्रिस राईट करतील. आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेच्या शिष्टमंडळाचा ग्रीनलँड दौरा खूप महत्त्वाचा असून हा दौरा मैत्रीपूर्ण असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
Site Admin | March 25, 2025 3:30 PM | Greenland | PM Mute B. Agade
ग्रीनलँडचे प्रधानमंत्री म्यूट बी. एगेडे यांची अमेरिकेच्या नियोजित दौऱ्यावर टीका
