ओदिशाला संपन्न सांस्कृतिक वारसा लाभला असून हे राज्य भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. नवी दिल्ली इथं आयोजित ओदिशा पर्व २०२४ या कार्यक्रमात ते बोलत होते. ओदिशाच्या आदिवासी समाजातली एक कन्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत, ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे प्रेरित होऊन ओदिशातल्या आदिवासींच्या कल्याणासाठी हजारो कोटी रुपयांचे असंख्य प्रकल्प सरकारने सुरू केल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात उभारलेल्या स्टॉल्सना प्रधानमंत्र्यांनी भेट दिली. नवी दिल्लीतल्या उडिया समाजाच्या विश्वस्त मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमात ओदिशाच्या वारशाचं जतन आणि संवर्धन केलं जातं. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमाची आज सांगता होत आहे.
Site Admin | November 24, 2024 7:50 PM | OdishaParba | PM Narendra Modi