अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी जेरुसलेम इथं तीन तास चर्चा केल्यानंतर इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतान्याहू यांनी हमासनं ओलिस ठेवलेल्या इस्रायलींच्या सुटकेबाबत मध्यस्थी करण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव मान्य केला. इस्रायलच्या सुरक्षेच्या गरजा लक्षात घेऊन ओलिसांच्या सुटकेसाठी मध्यस्थी करण्याच्या अमेरिकेच्या प्रस्तावाशी इस्रायल वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार नेतान्याहू यांच्या कार्यालयानं प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात केला. नेतान्याहू यांनी अमेरिकेच्या प्रस्तावाला पहिल्यांदाच जाहीररीत्या दुजोरा दिला असल्याचं निवेदनात नमूद केलं आहे. नेतान्याहू यांनी अत्यंत रचनात्मक पद्धतीनं हा प्रस्ताव मान्य केल्याचं ब्लिंकन यांनी सांगितलं.