प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रिओ द जानेरो इथं जी-20 परिषदेच्या निमित्तानं, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ ईनाचिओ लुलादा सिल्व्हा यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, जैव इंधन, संरक्षण, आणि कृषी इत्यादी विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यात सुधारणा करण्याबाबत कटीबद्धता व्यक्त केली. भारत आणि ब्राझील यांच्यातल्या द्विपक्षीय संबधांचा व्यापक आढावा या चर्चेत घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे.
Site Admin | November 19, 2024 8:14 PM | G20 Summit | PM Narendra Modi