प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बिहारमधल्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण होणार आहे. यामध्ये दरभंगा इथं उभारण्यात येणाऱ्या एम्स संस्थेच्या पायाभरणी समारंभाचा समावेश आहे. या एम्स संस्थेत सुसज्ज आधुनिक रुग्णालयासह आयुष विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, परिचारिका महाविद्यालय आणि निवासी सुविधा असतील. मिथिलांचल भागातल्या नागरिकांचं हे गेल्या अनेक वर्षांपासूनचं स्वप्न असून पुढच्या तीन वर्षांत ते पूर्ण होईल असं आमच्या वार्ताहरानं म्हटलं आहे.
याबरोबरच विविध राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी, १८ जनऔषधी केंद्रांचं उद्घाटन यासह पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.
Site Admin | November 13, 2024 1:50 PM | development projects | Prime Minister Narendra Modi