पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या भुयारीमेट्रो मार्गाचं लोकार्पण उद्या दुपारी साधारण 12 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले..
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यानंतर स्वारगेट इथल्या गणेश कला क्रीडा मंच इथ जाहीर सभा होणार असल्याचंही मोहोळ यांनी सांगितलं.