वाशीम जिल्ह्यात मनोरा तालुक्यातल्या बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथं बंजारा विरासत संग्रहालय उभारण्यात आलं आहे. येत्या शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचं लोकार्पण केलं जाणार आहे. संग्रहालयाच्या चार मजली इमारतीच्या १३ दालनांमध्ये विविध देखावे आणि चित्रांद्वारे बंजारा समाजाचा इतिहास, त्यांचे उत्सव, समाज जीवन रंगवण्यात आलं असून एका दालनात समाजाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या थोर नेत्यांची माहिती आणि पुतळे ठेवण्यात आले आहेत. संग्रहालयाचं एक विशेष दालन जगद्गुरू संत सेवालाल महाराज यांचं जीवन चरित्र आणि उपदेश याना समर्पित आहे.
Site Admin | October 3, 2024 3:25 PM | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी | बंजारा विरासत संग्रहालय | वाशीम