परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारी म्हणजेच १० फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत. परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन विद्यार्थ्यांना करता यावं या दृष्टीनं प्रधानमंत्री या कार्यक्रमातून मार्गदर्शन करतात. नवी दिल्लीच्या भारत मंडपम् मधे होणाऱ्या या कार्यक्रमात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातले प्रत्येकी ३६ विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होणार आहेत. यंदा या कार्यक्रमाचे एकूण ८ भाग होणार असून उर्वरित भागात विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्ती त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगणार आहेत.
Site Admin | February 6, 2025 8:13 PM | परीक्षा पे चर्चा | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमवारी परीक्षा पे चर्चा मधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार
