पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जुलै ला रशिया दौऱ्यावर जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुंन पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मास्को इथ 22 व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध प्रांतिक आणि वैश्विक मुददयांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
त्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावर जाणार असून, गेल्या 41 वर्षात भारताचे पंतप्रधान प्रथमच या देशाला भेट देणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी राष्ट्रपति अलेक्जेंडर वान डेर बेलेन तसच चान्सलर कार्ल नेहम्मर यांच्याशी दोन्ही देशातील संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने विविध मुद्द्यावर चर्चा करणार आहेत. हे दोन्ही नेते दोन्ही देशातील उद्योगपतींशी ही चर्चा करणार आहेत. तसच पंतप्रधान मोदी मास्कोमध्ये आणि वियनामध्ये तिथल्या भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत.