प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २३ तारखेपर्यंत तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री येत्या शनिवारी विल्मिंग्टन इथं होणाऱ्या चौथ्या क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. रविवारी ते अमेरिकेतल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील. तर सोमवारी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत भविष्यातली परिषद या विषयीच्या परिषदेला संबोधित करतील. कृत्रिम बुद्घिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग, सेमीकंडक्टर आणि जैवतंत्रज्ञान यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रात सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधतील.
Site Admin | September 19, 2024 6:28 PM | अमेरिका | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी