प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बाविसाव्या भारत रशिया वार्षिक परिषदेसाठी ८ आणि ९ जुलै रोजी रशियाचा दौरा करणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मोदी यांना आमंत्रण दिलं असून या परिषदेत दोन्ही देशांच्या प्रादेशिक तसंच जागतिक प्रश्नांविषयी चर्चा होईल, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री ९ आणि १० जुलै रोजी ऑस्ट्रियाचा दौरा करतील. ४१ वर्षांनंतर प्रथमच भारताच्या प्रधानमंत्र्यांचा ऑस्ट्रिया दौरा होत आहे. या दौऱ्यात मोदी ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अॅलेक्झांडर वॅन देर बेलेन यांची भेट घेणार आहेत. तसंच, ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमार यांच्याशी चर्चाही करणार आहेत.
Site Admin | July 4, 2024 8:43 PM | India-Russia Annual Conference | PM Narendra Modi