डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्यातल्या त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोटीतून संगमावर फेरी मारली. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर
त्रिवेणी संगमावरचं स्नान ही दैवी अनुभूती असून त्यावेळी कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या कोट्यवधी भाविकांप्रमाणे आपलं मनही भक्तिमय झालं होतं, अशा भावना प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर व्यक्त केल्या. जीवनदायिनी गंगा देशवासियांना शांती, सद्बुद्धी, उत्तम आरोग्य आणि सौहार्दाचा आशीर्वाद देईल, असंही मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा